सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
सुप्त कलागुणांना वाव देऊन अव्वल दर्जाचे लिखाण करीत स्पर्धांमध्ये उतरले तर कलागुणांना तसेच अव्वल दर्जाच्या लिखाणाला विजेतेपद मिळत असते.परिणामी ती व्यक्ती पुरस्कारासाठी प्राप्त ठरत असून पुढील स्पर्धेसाठी प्रोत्साहन मिळत जात असल्याने पुरस्कार स्पर्धकांसाठी एक कौतुकाची थाप आसल्याचे प्रतिपादन ख्यातनाम कवयित्री श्रीमती शांभवी बोधे यांनी केले.
भोर येथील साहित्य सहवास मंडळ यांच्या राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धा व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या काव्य स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी बोधे सोमवार दि.९ बोलत होत्या. या कार्यक्रमात ध्रुव प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजीव केळकर यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तर विनोदी काव्य स्पर्धेतील विजते स्पर्धक शैला भाडळे (चाकण ),रवींद्र गडकर, रामचंद्र आवटे (चाकण ),रामचंद्र अघोर( सोलापूर ),मधुकर पानसरे (पुणे), डॉ. लता थोरात (अकोला), जयंत कोपर्डीकर (पुणे), प्रकाश सकुंडे ,सुजाता पाटील, तर प्राथमिक शिक्षक काव्य स्पर्धेत पुरुषोत्तम लडकत, मनीषा थोपटे ,संगीता जाधव तसेच उत्तेजनार्थ अविनाश कुचेकर व मुद्रिका शिंदे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर,नामवंत लेखक श्रीनिवास भणगे, माजी जि. प.आदर्श सदस्य चंद्रकांत भाठे ,सहवास मंडळाचे अध्यक्ष सुरेश शेटे,उपाध्यक्ष संजय इंगुळकर,खजिनदार राजेश महांगरे ,सचिव सुरेश शिंदे,कार्याध्यक्ष सारंग शेटे,सदस्य शालिनी खुटवड, विठ्ठल टिळेकर ,अर्जुन खोपडे,सीमा तनपुरे, प्रा.साळवेआदींसह मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. विक्रम शिंदे यांनी केले.