सोमेश्वर रिपोर्टर टीम---- --
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील ३२ गाव खोऱ्यातील भाटघर धरण परिसरातील कुरूंजी ता.भोर येथे अवैद्य धंदा(दारू विक्री) करणाऱ्या इसमास ग्रामस्थ ,तरुण मंडळ तसेच पोलीस पाटील यांनी गांधीगिरी पद्धतीने सत्कार सन्मान करून दारू विक्री बंद करण्यासाठी भाग पाडले. कुरूंजाई देवीची यात्रा सालाबाद प्रमाणे दिमाखात पार पडली.यात्रा कमीटीच्या बैठकीत गावातीले अवैद् दारूविक्री बंद करण्याचे ठरले.मात्र दारू विक्री गावातीलच इसम मारूती कचरे पोलीसांनाही न जुमानत धंदा करीत असे.या अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमास ग्रामस्तमंडळ ,सरपंच ,पोलीस पाटील, गावातील प्रतीष्ठीत सर्जेराव शिळीमकर, बापु कामथे, माउली नलावडे, विठ्ठलनाना वरखडे आदींनी एकत्र येवून दारू विक्रीकरनारास समजूत घालून मारहान न करता गांधीगीरी मार्गाने सर्व गावाच्या साक्षीने नारळ व हार घालुन सत्कार सन्मान केला व दारूविक्री न करन्याची शपथ घेन्यास भाग पाडले. कुरुंजी नागरिकांनी गांधीगिरी पद्धतीने केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याने परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे.