सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व मा. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोगनिदान शिबीर व चष्मेवाटप करण्यात येणार आहे.
दि ११ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सोमेश्वर पॅलेस मंगल कार्यालयात हे शिबीर संपन्न होणार आहे. यामध्ये हृदयरोग व मधुमेह तपासणी, हाडांच्या तपासण्या, मासिक पाळी समस्या, बी. पी., डोळे तपासणी, दातांच्या तपासण्या, वजन, ईसीजी, त्वचाविकार, मानसिक आरोग्य आदी तपासण्या होणार आहेत. तरी सर्वानी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.