पुरंदर ! सोमेश्वर कारखान्याच्या कामगाराला हार्वेस्टर मालक व चालकाची दगडाने मारहाण

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
नीरा : विजय लकडे
बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकरी साखर कारखान्याच्या शेतकी विभागाच्या कामगाराला हार्वेस्टर चालक व मालकाने दगडाने मारहाण केल्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे. हा मारहाणीच्या निषेधार्थ सायंकाळी याचा निषेध करण्यासाठी सभा आयोजित केली असल्याचे समजत आहे. 
            याबाबत सविस्तर हकीकत अशी की सोमेश्वर कारखाना हा चार हार्वेस्टरच्या मागे एका कामगाराची नेमणूक करत असतो. त्यामुळे नेहमीप्रमाणे कारखान्याचे कामगार तेजस थोपटे हे मांडकी गट नं सहा मधील ऊसतोड सुरू असलेल्या रवींद्र सणस यांच्या तक्रारीवरून पाहणी करण्यासाठी गेले असता. हार्वेस्टर मालक व चालक यांनी हाताने व दगडाने मारहाण केल्याचा आरोप थोपटे यांनी  केला आहे. 
To Top