सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोरमध्ये सुरू असलेल्या एका नामवंत शिक्षण संस्थेचे बांधकामासाठी वापरण्यात आलेल्या सिंमेटच्या पोत्याचा मोठा अपहार झाला आहे.अपहार करणाऱ्या आठ जणांविरुद्ध भोर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून एकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीवरुन फिर्यादी खरम चाँद पटेल ( रा. लातुर , सध्या रा. भोर ) यांनी शहरातील शिक्षण संस्थेचे बांधकाम करणाचा ठेका घेतला आहे. बांधकाम सुरु असताना सिंमेटच्या पोत्याचा अपहार होत असल्याचा संशय आल्यावर संबधीत ठेकेदारांच्या सुपरव्हायजर यांने भोर पोलिस ठाण्यात रविवार दि. १ संशयतावर फिर्याद दाखल केली. नंतर भोर पोलिसांनी लोणी काळभोर , नसरापुर , कापुरव्होळ , हडपसर येथे आरोपीचा शोध घेतला असता हडपसर येथून ट्रक ड्रायव्हर सुरज प्रकाश उघडे वय - २२ ( रा. राईजवस्ती लोणी काळभोर मूळ उस्मानाबाद ) यांस अटक केली. यानंतर पोलिसांनी त्या आरोपीस खाक्या दाखवून माहिती घेतली असता अटक केलेल्या आरोपीने इतर आरोपीची नावे सांगितली.यामध्ये अभिजीत आबासाहेब झिटे,सचिन आबासाहेब झिटे, तानाजी गोरे, सतिश दिलीप उघडे, आनंता शेंडगे, खिलाजी ठोंबरे, विष्णू सोन्याबापू उघडे हे सात आरोपी फरारी आहेत.भोर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बळीराम सांगळे , पोलिस हवालदार विकास लगस,उध्दव गायकवाड यांनी तपास करुन ट्रक गाडी एम.एच-२३ डब्लु ०९४७ मधील ऑर्डरची ६०० श्री सिमेंट पोत्या पैकी ४६५ सिमेंट पोती बांधकामाचे ठिकाणी खाली करून ती ६०० पोती दिसतील अशा स्थीती ढिगारा लावुन त्या पैकी १३५ श्री सिमेंट पोती किंमत रूपये ४०,५००/- चा सिमेंटचा माल गाडीतच लपवुन ठेवुन संगणमताने अपहार करून फसवणुक केलेली आहे. फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सिंमेट पोती अपहार मध्ये शहरातील दुकानदार , बिल्डर यांचा मोठा हात असल्याचा संशय असून सिंमेट चोरीचे मोठे रँकेट उघडे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS