भोर ! वाढदिवस अभिष्टचिंतन ! गोरगरिबांचे कैवारी अनंतराव थोपटे

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के  
भोर तालुक्याच्या शहरी तसेच ग्रामीण भागात सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात माजी मंत्री तथा राजगड ज्ञानपीठ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव थोपटे यांनी अनन्य साधारण काम उभे करून हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनून सर्वसामान्य जनतेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध केल्याने माजी मंत्री थोपटे हे भोर तालुक्यातील गोरगरीब जनतेचे कैवारी असल्याचे बुधवार दि.११ अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केले गेले.
     थोपटे यांनी भोर तालुक्यात सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करून विकासाची गंगा आणून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावित भावी उच्चशिक्षित पिढी निर्माण केली.भोर तालुक्याचे नाव महाराष्ट्रात काय तर देशात व विदेशातही थोपटे यांनी पोहोचवले असेही कार्यकर्ते म्हणाले. वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील राजकीय शैक्षणिक क्रीडा उद्योग व्यापार सहकार सामाजिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर व विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.याप्रसंगी युवा नेते पृथ्वीराज थोपटे, राजगड संचालक उत्तम थोपटे,युवा उद्योजक अनिल सावले ,ख.वी.संघ चेअरमन अतुल किंद्रे ,संचालक संपत दरेकर,गोरख मानकर, ऍड.चंद्रकिरण साळवी, प्रा.चंद्रकांत नांगरे,राजाराम तुपे,पोपट मालुसरे,भानुदास थोपटे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष साहेबराव थोपटे,उपसरपंच दीपक गोळे,दादा रवळेकर,रामचंद्र थोपटे,प्रा.जयवंत थोपटे,संतोष म्हस्के आदींसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

To Top