सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
मेढा : ओंकार साखरे
मेढा - कुसुंबी येथिल तिर्थ क्षेत्र म्हणून दर्जा प्राप्त झालेल्या श्री काळेश्वरी देवीच्या मंदिर परिसरात पंचक्रोशीतील जनतेला सुलभतेने तरकारीसह इतर वस्तु उपलब्ध होण्यासाठी आठवडा बाजार सुरु करण्यात आला असून या आठवडा बाजारास येवुन व्यापार्यानी सहकार्य करावे असे आवाहन कुसुंबी गावचे सरपंच बापु चिकणे यांनी केले आहे.
यावेळी कृषी सहायक शाम मेंडके, माजी सरपंच किसन चिकणे, श्री काळेश्वरी देवी ट्रस्टचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, महिला आणि आर एस सी डी अवार्ड संस्था मुंबई यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र फौडेशन मार्फत पंचम प्रकल्पा अंतर्गत आठवडा बाजार सुरु करण्यात आला असुन कृषी सहाय्यक शाम मेंडके यांच्या हस्ते उद्घाटण सोहळा संपन्न झाला त्यावेळी सरपंच बापु चिकणे बोलत होते.
यावेळी आठवडा बाजारास केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उपस्थित झालेल्या व्यापाऱ्यांचे मान्यवरांचे हस्ते स्वागत करण्यात आले. वेण्णा दक्षिण विभागामध्ये गांजे, कुसुंबी, तांबी , काळोशी , दुंद, मालचौंडी, निझरे, सायळी सह डोंगर माथ्यावर असणाऱ्या वाड्या वस्त्यांना व गावांना याचा फायदा होणार आहे. कुसुंबी हे गाव श्री काळेश्वरी देवीमुळे प्रसिद्ध असल्याने भाविकांची मोठी गर्दी असते त्याचा फायदा निश्चितच व्यापार्यांनी याना मिळणार आहे.
दरम्यान आठवडा बाजार पेठेमध्ये सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित बांधव महिला यांनी व्यापारी यांच्याकडून वस्तु खरेदी करीत पहिल्याच बाजाराचा दमदार शुभारंभ केला.