मेढा ! ओंकार साखरे ! धनदांडग्यांना पाठीशी घालणाऱ्या मेढा नगरपंचायत मुख्याधिकारी पवार यांची चौकशी करा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : प्रतिनिधी
मेढा नगरपंचायतीच्या हद्दीमधील गट नंबर 115/2 मधील नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह रोखून बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या धनदांडग्यांना मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार पाठीशी घालत असल्याने पवार यांच्यावर कारवाई करा अन्यथा दि. २६ जानेवारीला अंदोलन करणार अशी मागणी रिपाइं (A) चे जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेनाव्दारे मागणी केली आहे.
            या निवेदना मध्ये असे म्हटले आहे की, मेढा नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामांचा  ऊत आला आहे. दिनांक 21/11/2022 रोजी मुख्याधिकारी यांना लेखी तक्रार निवेदन देऊनही आज अखेर कोणतीही कार्यवाही अथवा कारवाई केली नाही. तसेच माहिती अधिकाराच्या माध्यमातून माहिती ही दिली नाही.
            निवेदनात पुढे म्हटले आहे की, सदर बांधकाम हे नैसर्गिक ओढ्यावर सुरू असल्याने भविष्यकाळात याचे परिणाम मेढा वासियांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे नैसर्गिक ओढ्याचा प्रवाह रोखून त्यावर बांधकाम करणाऱ्या  धनदांड्यांवर कारवाई करुन तात्काळ बांधकाम थांबवून सदर बांधकाम पाडावे अशी मागणी करण्यात आली आहे.
            तसेच अशा बेकायदेशीर बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या मुख्याधिकारी अमोल पवार व बांधकाम अधिकारी साबळे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आयु. दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली 26 जानेवारी रोजी  कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे रिपाइं (A) चे जिल्हा सचिव किरण बगाडे यांनी निवेदनाद्वारे सांगीतले आहे.

To Top