सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील कायमच उपक्रमशील असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच पंचक्रोशी आदर्श विद्यालय नेरे ता.भोर येथे राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद सप्ताहनिमित्त महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
वेगवेगळ्या महापुरुषांची वेशभूषा करून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली तर पंचक्रोशी आदर्श विद्यालयात डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या विषयी विद्यार्थ्यांनी वक्तृत्व करून ग्रामस्थांना मोहित करून टाकले. पुढील सात दिवस विद्यालयात सप्ताह विविध स्पर्धा घेऊन होणार असल्याचे उपशिक्षिका रजनी पोतदार यांनी सांगितले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष शत्रुघ्न सावले, तंटामुक्ती अध्यक्ष आनंदा बढे, माजी सरपंच महेश उभे, जि. प.शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष म्हस्के,लहू सावले,ज्ञानेश्वर कानडे,बापू सावले,उपशिक्षक सदानंद जाधव, सुनिता कदम ,सारिका गुरव,चंद्रकांत कुंभार,संपत रांजणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
COMMENTS