भोर ! खानापूर विद्यालयात क्रीडा स्पर्धा उत्साहात

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा राजगड ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव थोपटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिदोजी थोपटे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय खानापूर ता.भोर येथे क्रीडा स्पर्धांचे तीन दिवस आयोजन करण्यात आले असून दुसऱ्या दिवशी स्पर्धा उत्साहात पार पडल्या.
    क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन माजी सभापती बाळासाहेब थोपटे, युवा उद्योजक अनिल सावले,साहेबराव थोपटे, प्रा.तात्याराव जेटीथोर,सामाजिक कार्यकर्ते संपत दरेकर,सरपंच मंगल गायकवाड,उपसरपंच अंकुश पोळ यांच्या हस्ते करण्यात आले. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळत असतो म्हणूनच भविष्यातील आदर्श नागरिक घडविण्यासाठी क्रीडा स्पर्धांना महत्वाचे स्थान देणे गरजेचे असल्याचे विश्वस्त पंढरीनाथ भिलारे यांनी मार्गदर्शन पर भाषणात व्यक्त केले. यावेळी प्राचार्य रमेश बुदगुडे,माजी सरपंच प्रमोद थोपटे,बळीराम थोपटे,शिवाजी रा.थोपटे,संपत तनपुरे,पत्रकार संतोष म्हस्के,शाम जेधे,बाळूआप्पा थोपटे,शिवाजी तू.थोपटे,क्रीडा शिक्षक दादा रवळेकर,जयवंत थोपटे, प्रा.धोंडीबा कुमकर,दीपक गोळे,नवनाथ तनपुरे,आदींसह सर्व शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
To Top