वाई ! धनंजय गोरे ! रमेश गर्जे यांचेकडे भुईंज पोलीस स्टेशनचा कार्यभार तर एपीआय आशिष कांबळे यांची वाई उपविभागीय कार्यालयात बदली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टिम------
जावली : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी कालच जिल्ह्यातील २२ सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी यांच्या बदल्या केल्या यामध्ये सातारा स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत असणारे रमेश गर्जे यांची भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली
           तसेच सध्या चार्ज असलेले भुईंज पोलीस स्टेशन चे  सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांची वाई उपविभागीय अधिकारी कार्यालयात वाचक म्हणून बदली झाली असून त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्याचा छडा लावण्यात यश मिळाले असून गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आशिष कांबळे यांना यश मिळाले असून त्याबद्दल त्यांचा पोलीस अधीक्षक यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले होते
            नुकताच चार्ज घेतलेले रमेश गर्जे देखील डॅशिंग अधिकारी म्हणून परिचित असून येणाऱ्या काळात सर्व सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतील असा विश्वास सर्व सामान्य जनता व्यक्त करीत आहे
To Top