सोमेश्वर रिपोर्टर टीम------
वडगाव निंबाळकर ; प्रतिनिधी
आत्ता याला आपण सोडायचे नाही याला जिवंत ठार मारून ऊसात टाकुन देऊ असे म्हणत अवैद्य गुंठेवारी करणाऱ्या गुंडांनी मोरगाव येथील पत्रकार विनोद पवार यांना दमदाटी व शिवीगाळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
याबाबत विनोद पोपट पवार, रा. तरडोली,ता. बारामती, जि.पुणे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून मंगेश जगताप रा.मुर्टी,ता.बारामती,जि.पुणे, सागर शिनगारे रा.पांढेश्वर ता.पुरंदर जि.पुणे व इतर चार अनोळखी(नाव व पत्तमाहीत नाही) यांचेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काल दि.4/2/2023 रोजी सकाळी 11/10 वाचे सुमारास तरडोली ता.बारामती जि.पुणे गावाचे हद्दीत आमचे जमीन गट नं.523 मध्ये हा प्रकार घडला.
सविस्तर हकिकत अशी, यातील आरोपी क्र 1ते 6 यांनी मोरयाडेव्हलपर्स’मधील प्लाँटींग मध्ये क्षेत्र कमी पडत असल्याचे कारणावरून आरोपी क्र 1व 2यांनी फिर्यादीला शिवीगाळ,दमदाटी करून त्याचे सोबत असणा-या 4 अनोळखी आरोपीना म्हणाले की,‘आत्ता याला आपण सोडायचे नाही याला जिवंत ठार मारून ऊसात टाकुन देऊ’’असे म्हणुन आरोपी क्र 1व 2 यांनी त्याचे हातातील ऊसाने फिर्यादीचे छातीवर मारून जखमी करून इतर 4 अनोळखी आरोपीनी फिर्यादीस हाताने लाथ्थाबुक्क्याने मारहाण करून जमीनीवर पाडुन त्या मधील अनोळखी 2 आरोपीनी त्यांचे हातातील लाकडी काठीने पवार यांना मारहाण केली.
त्या नंतर दुस-या अनोळखी आरोपीने त्याचे हातातील लोखंडी कढा हातात घेवुन फिर्यादीचे डावे डोळयावर मारून त्याना जखमी करून फिर्यादीला सोडविण्यासाठी त्यांचे वडील पोपट नामदेव पवार हे आले असता त्यांना आरोपी क्र 1व 2 यांनी त्यांचे हातातील ऊसा ने मारहाण करून दोन अनोळखी आरोपीनी फिर्यादीचे दोन्ही हात धरून आरोपी क्र 1व 2 हे फिर्यादीचे अंगावर बसुन फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देषाने दोघांनी फिर्यादीचा गळा त्यांचे दोन्ही हाताने दाबुन फिर्यादीला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.
पुढील तपास पोसई योगेश शेलार करीत आहेत.