सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
काटेवाडी दि २ (प्रतिनीधी ) :
बारामती तालुक्यातील खताळपट्टा येथील आर्दश महिला स्वयंसहायता महिला समुह बचत गटाच्या वतीने तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, स्वसंरक्षण जनजागृती सह सामाजिक एकतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी सहभाग घेतला.आर्दश महिला बचत गटाच्या वतीने ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांची ओटी भरून त्यांना ग्रृहपयोगी वस्तू वाण देण्यात आले. प्रास्तविक करताना प्रिंयका देवकाते यांनी महिला सक्षमीकरण, बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत चिंता व्यक्त करत महिला सक्षमीकरणाबाबत जनजागृतीपर विचार मांडण्यात आले. स्वसंरक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. संगीत खुर्ची,उखाणे,आदी मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले स्वागत अध्यक्षा दिपाली देवकाते, व सचिव हेमलता शेळके यांनी केले. यावेळी कविता लोंखडे, राणी शेळके, सुनंदा देवकाते, नलिनी शेळके, जयश्री देवकाते, स्वाती येळे, रेश्मा देवकाते, सारिका माने, पार्वती देवकाते, पूजा भिसे, मंगल घुले, पुनम सोलनकर अदि उपस्थित होते .