भोर न्यायालयात लोकआदालतीत ३३९ प्रकरणे निकाली निघाली : ८६ लाख ७३ हजार ६७७ रुपयांची वसुली

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर येथील दिवाणी व फौजादारी न्यायालयामध्ये शनिवार दि. ११ झालेल्या राष्ट्रीय लोकआदलतीमध्ये प्रलंबित प्रकरणे ७५९ ठेवण्यात आली होती. त्यापैकी १५१ प्रलंबित प्रकरणांमध्ये  तडजोड होऊन ४९ लाख २८ हजार ७ रुपयांची लोक अदालती मध्ये २४८० दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती त्यापैकी १८८ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ३७ लाख ४५ हजार ६७० इतक्या रकमेची वसुली झाली. ३२४० प्रकरणांपैकी ३३९ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण ८६ लाख ७३ हजार ६७७ रुपयांची वसुली झाल्याची माहिती वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.मयूर धुमाळ यांनी दिली.
         राष्ट्रीय लोकआदालतीमध्ये पॅनल १ मध्ये मुख्य पॅनल जज - श्रीमती. डी. ए. सरनायक ,पॅनल सदस्य अँड.दिपक बोरकर व पॅनल २ मध्ये सहदिवाणी न्यायाधीश  श्रीमती.एच.यु.यु.पाटील,पॅनल सदस्य अँड.राकेश कोंडे यांनी पॅनल सदस्य म्हणून कामकाज पाहिले.यावेळी भोर वकील संघटनेचे खूप मोलाचे सहकार्य लाभले असून भोर वकील संघटनेचे उपाध्यक्षअँड.बाळासाहेब गोगावले, अँड.अश्विनी कुलकर्णी, अँड.रमेश धाडवे, एस.पी.मरळ,अँड.विठ्ठल दुधाने,व्हि.जी.रोमन,एस.बादल, प्रूथवीराज चव्हाण, आर.खोपडे, विजय दामगुडे,अजिंक्य मुकादम, सौ.म्हस्के,सुर्वे, घोणे,लाड, बागल इतर सर्व वकील सदस्य उपस्थित होते.
To Top