भोर ! नीरा देवघरच्या डाव्या कालव्यामुळे १ हजार १११ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार : आ. संग्राम थोपटे यांची माहिती

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
निरा देवघर डाव्या कालव्याच्या कामासाठी २८ कोटी ४७ लाख ५८ हजार रुपये निधी मंजूर झाला असल्याने हिर्डोस मावळ व महुडे खोऱ्यातील १७ गावांमधील १,१११ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून कालव्याच्या कामाची लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती आमदार संग्राम थोपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
            नीरा देवघर धरणाच्या पावर हाऊसजवळून पाणी उचलून बंद पाईपलाईन द्वारे डावा कालव्याद्वारे करंजगाव, निगुडघर, म्हसर बुद्रुक, म्हसर खुर्द,आपटी, पिसावरे, ब्राह्मणघर ,नांद ,शिंद, महूडे बुद्रुक ,गवडी, किंवत, भोलावडे या १७ गावांमधील कोरडवाहू जमीन ओलिताखाली येणार आहे.तर सुमारे १,१११ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येत असून सदर कालव्याची लांबी सुमारे १८ किलोमीटर असून प्रवाही कालव्याद्वारे सिंचन क्षेत्र समाविष्ट आहे.बंद नलिकेद्वारे धरणातील पाण्याच्या दाबाचा वापर होत असल्याने जलाशय पातळीनुसार तलांक पातळीनिहाय क्षेत्रास सिंचनाचा लाभ देणे शक्य होणार आहे.यावेळी माजी जि.सदस्य विठ्ठल आवाळे,माजी सभापती बाळासाहेब थोपटे,नीरा डावा कालवा समिती अध्यक्ष बबन खाटपे, सुरेश राजीवडे, शंकर पारठे, दीपक कुमकर, किसान सेल अध्यक्ष संजय मळेकर ,चंद्रकांत चंदनशिव, दीपक गायकवाड उमेश दुधाने, अतुल शेडगे, शंकर माने ,संपत साळुंखे, सुरेश शेटे, लक्ष्मण कुमकर ,शंकर राजीवडे ,नथुराम दामगुडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
To Top