सोमेश्वर रिपोर्टर टीम------
होळ : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील होळ येथे देवीच्या दर्शनासाठी आलेल्या पुण्याचा माणूस नीरा नदीत बुडाला असून शोधकार्य सुरू आहे.
पुणे धायरी येथील बबलू केशव जाधव वय ५५ वर्ष हे नीरा नदी पत्रात १५ फूट पाण्यात बुडाले आहेत. वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे उसपोनि योगेश शेलार व पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरू आहे. जाधव हे दरवर्षी होळ येथील ढगाई देवीच्या दर्शनासाठी येत असतात. बाहेरील देवीचे दर्शन घेतल्यानंतर नदीपात्रात असलेल्या ढगाई देवीच्या दर्शनासाठी जात असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले आहेत.