सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर उपविभागीय विद्युत केंद्राची तब्बल ३९ कोटी २३ लाख थकबाकी असल्याने महावितरणने शेती पंपाची १३ हजार ३०१ कनेक्शन पैकी १८०० कनेक्शन कट केली असल्याची माहिती उपकार्यकरी अभियंता सचिन म्हेत्रे यांनी दिली.
महावितरणने सप्टेंबर २०२० पूर्वी असलेल्या शेती पंपाच्या थकबाकीवर ३० टक्के सूट दिली होती. महावितरण वारंवार विजेचे बिल भरण्याबाबत शेतकऱ्यांना सूचना करत असते. ३९ कोटी २३ लाख ही जुनी थकबाकी असून सप्टेंबर २० पासून आजपर्यंत असणाऱ्या थकबाकीवर शेतकऱ्यांना महावितरणने ३० टक्के सवलत मिळणार असून १ एप्रिल नंतर या थकबाकीमध्ये कोणत्याही प्रकारची सूट मिळणार नाही. १३ हजार ३०१ थकबाकीदार शेतकऱ्यांपैकी महावितरणने सोमेश्वर उपविभागीय केंद्राअंतर्गत येणाऱ्या कोऱ्हाळे, मोरगाव, नीरा, सोमेश्वर, सुपे वडगाव या गावातील शेती पंपाची तब्बल १८०० वीज कनेक्शन कट केली आहेत.
----------------------
सोमेश्वर उपविभागीय केंद्र------
गाव थकबाकीदार रक्कम
कोऱ्हाळे १४२१ ५. ७७ लाख
मोरगाव २३७८ ५.१० लाख
नीरा १७७५ ५.३६ लाख
सोमेश्वर ३१६२ ९.८२ लाख
सुपे ३३७६ ८.९४ लाख
वडगाव ११८९ ४.२२ लाख