भोर ! अज्ञात वाहनाच्या धडकेत खानापूर येथील महिला गंभीर जखमी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पहाटेच्या वेळी शिरवळ येथील छडा कंपनीत कामावर जाण्यासाठी भोर- आंबाडखिंड मार्गावरील खानापूर(नांगरेवाडी) फाट्यावर सुजाता सचिन नांगरे (वय-३२) उभे असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर भारती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत.
         भोर तालुक्यात बेरोजगार तरुण, तरूणींना  रोजगाराची सोय नसल्याने खंडाळा तालुक्यातील शिरवळ ,विंग परिसरातील विविध कंपनीमध्ये जावे लागत असते. सुजाता नांगरे या शनिवार दि.११ पहाटे ६ च्या दरम्यान शिरवळ परिसरातील छडा कंपनीत कामासाठी जात असताना नांगरेवाडी ता.भोर फाट्यावर उभ्या होत्या. याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात दुचाकी वाहनाने त्यांना धडक दिली त्यात त्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
To Top