भोर ! नेरे आरोग्य केंद्रात जागरूक पालक सदृढ बालक योजनेचा शुभारंभ

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
दुर्गम डोंगरी भागातील  प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे ता.भोर येथे जागरूक बालक सुदृढ बालक योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून या योजनेअंतर्गत १२५ लाभार्थींना आरोग्यसेवा देण्यात आली.
     आरोग्य शिबिरामध्ये गरोदर मातांना स्त्री रोगतज्ञ डॉ. इमरान खान तर नेत्र तपासणी श्रीमती स्मिता धिरडे यांनी करून मार्गदर्शन केले.तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेरे येथे जागरूक पालक सदृढ पालक अभियाना अंतर्गत २५ विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या आरोग्याच्या मोफत तपासन्या करून औषध उपचार करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.मिलिंद अहिरे,डॉ.श्रुती रवळेकर,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.प्रज्ञा वरे,डॉ.प्रज्ञा भरगुडे, डॉ.किरण भराटे,डॉ.सुजाता पवार,सरपंच उज्वला बढे,उपसरपंच राजेंद्र चिकने,सदस्य अनिता शेलार,मधुकर कानडे,महेश उभे,संतोष म्हस्के,दशरथ सावले,शिक्षिका सुजाता भालेराव,रांजणे मोहिनी गायकवाड, सुरेखा म्हस्के तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.या जागरूक पालक सदृढ बालक अभियानाची नेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत असणारे उपकेंद्र पसुरे ,उत्रोली, वेळवंड-पांगारी, शिंद या कार्यक्षेत्रात सुरूवात करण्यात आली आहे असे डॉ.मिलिंद अहिरे यांनी सांगितले.

To Top