खंडाळा ! लोणंद पोलिसांची दमदार कामगिरी : बसस्टॅन्डमध्ये महीलांच्या गळयातील दागिने चोरणारी आंतरजिल्हयातील टोळी जेरबंद

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रशांत ढावरे
लोणंद पोलीस ठाणे हददीत बसस्टॅण्ड लोणंद येथे महीला बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेवुन वृध्द महीलांचे गळयातील सोन्याचे दागिने चोरी केलेबाबत लोणंद पोलीस ठाणेत गुन्हे दाखल झाले होते. 
        सदर गुन्हयाचे तपासाबाबत वरीष्ठ अधिकारी यांनी सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि विशाल वायकर व त्यांचे सहका-यांनी सदर घडणा-या गुन्हयाबाबत सीसीटीव्ही फुटेज तांत्रीक विष्लेषनाचे आधारे यातील आरोपीनी गुन्हा करतेवेळी वापरलेली इनोव्हा कार व आरोपी निष्पन्न केले. सदर आरोपी या महीला असुन त्या उदगीर, लातूर येथून इनोव्हा कारमधुन येवुन त्यांनी लोणंद तसचे वाई, औरंगाबाद (ग्रा) .कवठे महाकाळ (सांगली), सांगली शहर, नाशिक, ओतुर (पुणे), लोणीकंद (पुणे) या पोलीस ठाणे हददीतील एकुण १६ चोरीचे गुन्हे केलेचे निष्पन्न झालेले आहे. सदर महीला आरोपींची पोलीस कोठडी घेवुन आरोपींकडुन चोरी केलेले एकुण १० तोळे सोन्याचे दागिने, व इनोव्हा कार असा एकुण १५,४०,०००/- रु. किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
------------
आरोपींची नावे
 हैसाबाई नामदेव कांबळे वय ४५ वर्षे रा.उदगीर गांधीनगर ता. .उदगीर जि लातूर, हारणाबाई बाबू सकट वय ६५ वर्षे रा.बाहेगावरोड, आनंदनगर, देगणूर ता.देगणूर जि. नांदेड, नरसिंग कोंडीबा बन वय ३८ वर्षे, रा. उदगीर गांधीनगर ता.उदगिर जि.लातूर
To Top