धक्कादायक ! मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थाचे तीन महिन्याचे जेवणाचे बिल तब्बल २ कोटी ३८ लाख रुपये : माहिती अधिकारात माहिती उघड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानावर खानपान सेवेसाठी दि.१ जुलै २२ ते ३१ ऑक्टोबर २२ या १२३ दिवसात २ कोटी ३८ लाख ३४ हजार ९५८ रुपयांची उधळपट्टी करण्यात आली असुन दिवसाला सुमारे १ लाख ९३ हजार रुपयांचा खर्च मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकिय निवास्थानावर होत असल्याची धक्कादायक माहिती  माहिती अधिकारात उघड झाली आहे. 
            बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील नितीन संजय यादव यांनी मागितलेल्या महिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे.  नुकतेच शिंदे सरकारने ७ महिन्यात जाहिरातींसाठी ४२ कोटी रुपये शासकीय तिजोरीतुन खर्च केल्याची माहिती मला माहिती अधिकारात मिळाली होती त्यानंतर अत्ता मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थानचा होणार्या वारेमाप खर्चाची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
------------------
सहयाद्री अतिथिगृहाता चहा कॅाफी नाश्ट्यासाठी ८ दिवसात ९१ हजार ५०० रुपयांचा खर्च केल्याचे दिसुन येत असुन मुख्यमंत्री बैठक व त्यांचे भेटीसाठी आलेल्या व्यक्तींसाठी चहा कॅाफी थंडपेयेसाठी ३ लाख ४९ हजार ९२९ रुपयांचा खर्च केल्याची माहिती या पत्रात आढळुन येत आहे. त्यामुळे वारेमाप होणाऱ्या या उधळपट्टीवर अकुंश लावण्यासाठी शिंदे सरकारने प्रयत्न करावेत. 
नितीन संजय यादव
To Top