बारामती ! उमा, सोनाली, श्रद्धा ठरल्या होम मिनिस्टर खेळातील बक्षीसाच्या मानकरी : ३५० महिलांचा सहभाग

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर ता. बारामती येथील श्री छत्रपती जाणता राजा युवा प्रतिष्ठानच्या वतिने आयोजित केलेल्या महिलांसाठी होम मिनिस्टर खेळातील बक्षिसाच्या मानकरी उमा अमित निंबाळकर, सोनाली अमोल गायकवाड,  श्रद्धा सागर गायकवाड ठरल्या. 
उमा, यांना पैठणी,  सोनाली यांना सोन्याची नथ तर श्रद्धा यांना चांदीची जोडवी बक्षीस देण्यात आली. विविध स्पर्धेत एकूण 350 महिला सहभागी झाल्या प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य होता. ज्ञानेश्वर जगताप यांनी सूत्रसंचालन करत कार्यक्रम यशस्वी केला.  कार्यक्रमाचे उद्घाटन सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन प्रणिता मनोज खोमणे यांच्या शुभहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून झाले. यावेळी त्रिवेणी ऑइल मिलच्या संचालिका शुभांगी चौधर भगिनी मंडळ बारामती माजी अध्यक्ष राणी जगताप डीएड कॉलेज माजी प्राचार्य उज्वला सोनी, वैशाली जाधव, गुणश्री रासकर ग्रामपंचायत सदस्या सारिका खोमणे, अश्विनी खोमणे, राजश्री साळवे, प्रेमलता रांगोळे, मयुरी साळवे उपस्थित होत्या. 
              शिवजयंती निमित्त लहान मुलं तरुण आणि महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच कार्यक्रमांना गावातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र पवार यांनी दिली.
To Top