इंडिया बुलिअन & ज्वेलर्स असोसिएशनच्या मागण्यावर 'या' बजेटमध्ये केंद्राचे तोंडावर बोट : शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी बैठक

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
शनिवार दि ४ फेब्रुवारी रोजी इंडिया बुलिअन अँड ज्वेलर्स असोसिएशन ली. ( IBJA ) चे शिष्टमंडळ आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यात महत्वपूर्ण बैठक दिल्ली येथे होणार असून असोसिएशन च्या वतीने काही महत्वाचे मुद्दे मांडण्यात येणार असल्याची माहिती IBJA चे राज्य समन्वयक किरण आळंदीकर यांनी दिली.
              नुकताच अर्थ संकल्प जाहीर झाला असून तत्पूर्वी IBJA ने सोने चांदी वरील आयातशुल्क कमी करण्यात यावी अशी मागणी केली होती परंतु अर्थ संकल्पमध्ये तसें झाले नाही, सोने चांदी वरील आयातशुल्क कमी व्हावे, खरेदी साठी पॅनकार्ड मर्यादा वाढविण्यात यावी, ग्राहकांना बँकांच्या सहकार्याने EMI पद्धतीने म्हणजेच हप्त्यावर सोने मिळावे, सोने आणि सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीवरील टीडीएस काढून टाकण्यात यावा इत्यादी मागण्या केंद्रीय अर्थ मंत्री मा. निर्मला सीतारामन यांच्या समवेत होणाऱ्या बैठकीत असोसिएशन करणार असल्याचे किरण आळंदीकर यांनी सांगितले.
To Top