सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर - प्रतिनिधी
भारत सरकारचे क्रीडा मंत्रायल तसेच पुणे येथील
नेहरू युवा केंद्र युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय विशेष श्रमदान शिबीर सोमेश्वरनगर येथे पार पडले.
नेहरू युवा केंद्राचे उपसंचालक श्यशवंत मानखेडकर, लेखापरीक्षक सिध्दार्थ चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी पाण्याच्या रिकाम्या बाटल्या वापरून अभिनव पद्धतीने बंधारा तयार करण्यात आला. स्वयंसेवकांच्या वतीने स्वच्छता मोहिम पार पाडण्यात आली. शिबीरात गावातील ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
यावेळी वन विभागाचे योगेश कंक, नवनाथ चव्हाण, बाबुलाल पडवळ सर, नेहरू युवा केंद्राचे बारामती तालुका प्रतिनीधी धनश्री वायाळ, जय हनुमान व दत्त कृपा मंडळाचे कार्यकर्ते धिरज वायाळ, प्रसाद कर्चे,मयुर काछी, प्रतीक कर्चे, प्रशांत होळकर,मयुर वायाळ,चेतन वायाळ,अनिकेत काछी ,सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते