सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील पळसोशी ता.भोर येथील तरुणांचे आशास्थान तसेच तरुण सामाजिक कार्यकर्ते सुनील(पोपट) कोंडीबा जाधव वय -४० यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने पळसोशी गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.
सुनील जाधव हे युवा उद्योजक होते तर सामाजिक बांधिलकी जपत समाजातील तरुण तसेच तळागाळातील लोकांना कायमच मदतीचा हात देण्याचे कार्य करीत होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे.