सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कुरकूंभ : प्रतिनिधी
दौंड कुरकुंभ गावातील गायकवाड यांच्या कुटुंबातील त्यांचा लाडका श्वान जॅक याचा प्रथम वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला .
लाडक्या जॅकच्या वाढदिवसाची चर्चा पूर्ण दौंड तालुक्यात होत आहे . वाढदिवसानिमित्त जॅकला नवीन कपडे घालून ,केक कापून ,डीजे लावून व लहान मुलांच्या डान्स कॉम्पिटिशन ठेवून वाढदिवस साजरा करण्यात आला त्यावेळी सिद्धार्थ गायकवाड ,जयदीप पारधे,उदय गायकवाड ,महेश शिंदे यांच्यासह मित्रपरिवार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ,आमचा लाडका जॅक आमच्या कुटुंबातील एक सदस्य असून याचा प्रथम वाढदिवस आणि धुमधडाक्यात साजरा केला .