त्याचं... काश्मीर मध्ये अतिरिक्यांनी १९ वेळा अपहरण केलं...! पण अनाथ मुलींना सांभाळणारा तो 'खुदा का बंदा' वाटला... आणि सोडून दिले...! तो आज सोमेश्वरमध्ये आला होता... अनाथ मुलींना घेऊन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : महेश जगताप
माझ्या विरोधात काश्मीर मध्ये फतवे काढले....पण खचलो नाही...तिथले लोक बोलायचे आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत..तुम्ही इथंच राहायचं...१९ वेळा अतिरिक्यांनी अपहरण केलं..पण 'ये खुदाका बंदा' आहे म्हणून सोडून दिलं....आज मला अभिमान वाटतोय... इथल्या अनाथ मुलांसाठी गेली २५ वर्ष काम करताना..आज अनेक अनाथ मुलांनी स्वतःचा व्यवसाय, नोकरी तर अनेकांची लग्न देखील झाली आहेत.....अधिक कदम सांगत असलेले अनुभव सुन्न करणारे होते. 
           बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर कारखान्याला काश्मीर येथील कुपवाडा जिल्ह्यातील बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या ४० अनाथ मुलींनी भेट देऊन कारखान्याची माहिती घेतली. यावेळी कार्यकारी संचालक राजेंद्र यादव, संचालक संग्राम सोरटे, ऋषी गायकवाड, सचिव कालिदास निकम, कामगार कल्याण अधिकारी दत्ता माळशिकारे, कामगार अधिकारी दीपक निंबाळकर, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, धैर्यशील काकडे, पत्रकार संतोष शेंडकर, महेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. 
नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील अधिक कदम नावाचा माणूस काश्मीरला जातो काय... आणि तिथल्या अनाथ मुलांसाठी बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशन नावाची संस्था स्थापन करतो काय.... आज जम्मू आणि काश्मीर मध्ये कुपवाडा जिल्ह्यासह पाच ठिकाणी बोर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनमध्ये साडेतीनशे पेक्षा अधिक मुले शिक्षण घेत आहेत.
 अधिक कदम २००२ साली कुपवाडा जिल्ह्यात गेला असता त्यावेळी तिथली परिस्थिती चांगली नव्हती. ते पाहून तिथंच थांबण्याचा निर्णय अधिकने घेतला. त्याने सुरू केलेल्या या संस्थेमधून शकडो अनाथ मुले शिक्षण घेऊन बाहेर पडली असून कोण व्यवसाय करत आहे, कोण नोकरी करत आहे तर काहींची लग्ने झाली झाली असल्याचे अधिक कदम अभिमानाने सांगतो.
               यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र यादव बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील एक जण काश्मीर ला जातो आणि तिथल्या अनाथ मुलांसाठी आपले आयुष्य वाहून घेतो याचा आम्हा महाराष्ट्रातील लोकांना अभिमान आहे.   मुलींनी माहिती देताना ते सांगतात. हा कारखाना सहकार तत्वावर चालतो. या भागात प्रामुख्याने उसाचे उत्पादन घेतले जाते. साखरेव्यतिरिक्त वीज आणि इथेनॉलचे उत्पादन घेऊन यामधून मिळणारा नफा हा २८ हजार सभासदांना वाटला जातो. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देण्याचा संचालक मंडळ नेहमी प्रयत्न करते. याबरोबरच या संस्थेमार्फत इयत्ता पहिली ते पदवी पर्यंत शिक्षण ही दिले जाते. कार्यक्रमात ऋषिकेश गायकवाड यांनी अधिक कदम व बॉर्डरलेस वर्ल्ड फाउंडेशनच्या कामाला शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दत्ता माळशिकारे यांनी मानले. 
To Top