बारामती ! वाघळवाडी ग्रामपंचायतला पाटबंधारे खात्याचा दणका : स्मशानभूमीचे अनधिकृत बांधकाम हटाव अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील वाघळवाडी ग्रामपंचायतने नीरा डाव्या कालव्या शेजारी पाटबंधारे खात्याच्या हद्दीत पाटबंधारे खात्याची कोणतेही परवानगी न घेता स्मशानभूमीचे बांधकाम केले आहे. यावर संबंधित विभागाने वाघळवाडी ग्रामपंचायतला पत्र पाठवून अनधिकृत बांधकाम हटविण्यास सांगितले असून न हटवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. 
        कार्यालयाचे  निरा डावा कालवा साखळी किमी २०/०० ते २७/५०० दरम्यान निरीक्षण पथाकडील जलसंपदा विभागाच्या जागेत अनाधिकृतरित्या वाघळवाडी ग्रामपंचायतीने स्मशानभुमीचे बांधकाम केलेले आहे. सदर अनधिकृत स्मशानभुमीचे बांधकाम जलसंपदा विभागची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता करण्यात आले आहे व त्यावर वाघळवाडी ग्रामपंचायतला खुलासा सादर करण्यास कळविले होते. पाटबंधारे विभागाने ग्रामपंचायत वाघळवाडी यांना दिलेल्या पत्रात म्हणटले आहे की,  सदर बांधकाम न थांबल्यास होणा-या शासकीय कार्यवाहीची सर्वस्वी जदाबदारी ग्रामपंचायत वाघळवाडी यांची  राहील या विषयी देखील संदर्भीय पत्रान्वये आपणास अवगत करण्यात आले होते तथापि त्यानंतर ही आपला कोणताही खुलासा या कार्यालयास प्राप्त झालेला नसुन सदरील अनधिकृत वांधकामा विषयी आपण गंभीर नसल्याचे दिसुन येते त्यामुळे उपरोक्त उल्लेख केलेल्या अनधिकृत बांधकामाचा याबाबतचा खुलासा सदरील पत्र मिळताच सात दिवसांच्या आत या कार्यालयास तात्काळ सादर करावा तसेच संबंधित बांधकाम आपले खर्चाने हटविण्यात यावे आपण अथवा आपल्या कार्यालयाने या पत्राची प्रत मिळताच सात दिवसांची अवधीत कोणतीही कार्यवाही न केल्यास आपणावर शासकीय जागेत अनधिकृतरित्या अतिक्रमण केले बाबतचा गुन्हा दाखल करण्यात येईल याची जाणीवपूर्वक व गांभीर्याने नोंद घ्यावी त्याचप्रमाणे पुढील होणा-या शासकीय कार्यवाहीची संपूर्ण जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. असे पाटबंधारे विभागाने कळविले आहे.
---------------------
गावात झालेला विकास पहावत नसल्याने ग्रामपंचायतीच्या तक्रारी करण्याचा प्रकार होत असून समाजमाध्यमांवर नाहक बदनामी केली जात आहे. अनेक वर्षे गावाला सन्मशानभूमी नव्हती. गेल्या पंचवार्षिक मध्ये त्याचे काम हाती घेतले असून ते काम पूर्ण करण्याचे सुरू आहे. प्रत्येकाला देवाघरी एक दिवस जावं लागतं. देवाघरी जाताना अंत्यविधीचे ठिकाण चांगले असावे. त्यामुळे अश्या कामात खोडा घालण्याचा प्रकार करू नये. इतर गावच्या सन्मशानभूमी कोणत्या जागेत आहेत हे उघड्या डोळ्यानी पहावे. हा अख्या गावचा प्रश्न आहे.
अँड.हेमंत गायकवाड
सरपंच,ग्रामपंचायत वाघळवाडी

To Top