सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : संतोष म्हस्के
नाटंबी ता.भोर येथे श्री दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरु नारायण महाराज यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात झाला. मागील दोन दिवस विविध भागातील नामांकित कीर्तनकारांची समाजप्रबोधनपर किर्तने झाली.शुक्रवार दि.१९ श्री दत्तमूर्ती व कलशाचे पूजन रुद्र अभिषेक करत विधीपूर्वक पुर्ण झाले.तर सद्गुरूंची पारंपारिक वाद्यांच्या निनादात भव्य मिरवणूक काढून दत्त मूर्तीची स्थापना सद्गुरु नारायण महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आली.त्यानंतर मंदिराच्या शिखरावर कलशारोहण संपन्न झाले. लोकवर्गणीतून मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले असून कलशारोहण सोहळा यशस्वी होण्यासाठी नाटंबी गावातील ग्रामस्थ तरुण मंडळाचे सहकार्य लाभले. यावेळी यशवंत खोपडे ,शंकर खोपडे , नामदेव घाटे , भरत खोपडे , अंकुश खोपडे , ओंकार खोपडे , विनोद घाटे , पंढरीनाथ खोपडे , नवनाथ घाटे , विशाल खोपडे , शुभम खोपडे , पांडुरंग वाडकर , किरण खोपडे, सुरेश पोळ , पुंडलिक खोपडे , अमोल धोंडे , विकास खोपडे , समीर घोडेकर ,पराग शिळीमकर ,गणेश भागवत , संतोष मेढेकर , तानाजी चव्हाण व जयवंत बांदल उपस्थित होते.