सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सह. सा. कारखाना लि. सोमेश्वरनगर व श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, सोमेश्वरनगर संचलित, शरदचंद्र पवार गुप ऑफ इन्स्टीटयुटस् (सायन्स कॉलेज, डिप्लोमा कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज व (एम. बी. ए. कॉलेज) सोमेश्वरनगर यांच्या संयुक्त विद्यामाने दि.११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान विद्यार्थ्याच्या विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, आऊट डोअर व इन डोअर गेम्स, फनफेअर, ट्रेडिशनल डे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन हे आज शनिवार दि ११ फेब्रुवारी रोजी कारखान्याच्या उपाध्यक्षा प्रणिता खोमणे, संचालक राजवर्धन शिंदे व सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच दि. १२ रोजी फन फेअर ब ट्रेडिशनल डे, दि १३ व १४ रोजी प्रत्येक कालेजचे ( सायन्स कॉलेज, डिप्लोमा कॉलेज, इंजिनिअरींग कॉलेज व एम. बी. ए. कॉलेज) विविध उपक्रम व आऊट डोअर व इन डोअर गेम्स होणार आहेत.
दि १५ रोजी सोमेश्वर सायन्स कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचा समारंभ आपल्या बारामती तालुक्यातील सुप्रसिध्द चांडाळ चौकडी फेम टीम च्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. दि १६ रोजी शरदचंद्र पवार इन्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी या कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचा समारंभ सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांच्या उपस्थित संपन्न होणार आहे. दि १७ रोजी शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरींग व शरदचंद्र पवार इन्टीटयुट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च या कॉलेजचा वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षिस वितरणाचा समारंभ सुपसिद्ध सिनेअभिनेते श्री अशोक समर्थ यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती शरदचंद्र पवार ग्रुप ऑफ इन्स्टीट्यूट फिटिक्टर श्री आनंदकुमार होळकर यांनी प्रसिद्धीपत्रका व्दारे दिली. या प्रसंगी सचिव भारत खोमणे, पा. डॉ. संजय देवकर, प्राचार्य श्री सोमनाथ हजारे, श्री धनंजय बनसोडे, डॉ. निलेश लिवोरे, डॉ. शरद गावडे उपस्थित होते