भोर ! संतोष म्हस्के ! इमारत पण सुसज्ज....! सुविधा ही चांगल्या...पण विसगाव खोऱ्यातील ४५ गावातील नागरिकांना..रस्त्याअभावी नेरे आरोग्य केंद्रात पोहचण्यासाठी करावी लागते कसरत...

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे ता.भोर ४५ गावांतील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी सोयी सुविधांची सुसज्ज आहे. मात्र आरोग्य केंद्रात रुग्णांना ये-जा करण्याचा रस्ता अनेक वर्षांपासून खड्डेमय तसेच दुरावस्थेत असल्याने वयोवृद्ध रुग्णांची चांगलीच धडपड होत आहे.
              दुर्गम डोंगरी भागातील ४५ गावांतील रुग्णांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळावी या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत नेरे ता.भोर यांच्या सहकार्याने मिळालेल्या जागेवर कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाने सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे.आरोग्य केंद्राकडे ये - जा करण्यासाठी गावापासून काही अंतरावर सिमेंट काँक्रेटचा रस्ता करण्यात आलेला आहे. मात्र ५०० मीटर अंतरावरील रस्ता खड्डेमय दुरावस्थेत गेले अनेक वर्षांपासून आहे.पावसाळ्यात या रस्त्यावरून रुग्णांना अक्षरशा गुडघाभर पाण्यातून रुग्णालयात उपचारासाठी ये-जा करावे लागते.रस्त्याची  झालेली दुरावस्था याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात आले.लवकरात लवकर आरोग्य केंद्राकडे जाणारा रस्ता सुरळीत करावा अशी मागणी रुग्णांकडून होत आहे.
To Top