मेढा : ओंकार साखरे
श्री क्षेत्र कुसुंबी येथिल कुसुंबी मुऱ्यावर पांडूरंग कोकरे यांच्या गायीची बिबट्याने शिकार केल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी डोंगर माथ्यावरील रहिवाशांनी केली आहे.
सध्या या विभागात बोटोलिजम हा आजार आला असून आतापर्यत अनेक जनावरे आजाराने दगावली आहेत आणि काही जनावरे बोटोलिजम आजाराने त्रस्त आहेत. अशा परिस्थित वन्य प्राण्यांकडून जनावरांवर हल्ले होत असल्याने येथिल शेतकरी चिंतेत पडला आहे.
जनावराची संख्या जावली तालुक्यातील घटत चालली असताना जे शेतकरी उदर निर्वाहासाठी दुग्ध व्यवसायातुन रोजीरोठी जमविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या त्यांच्यावर बोटोलिजम आजारा बरोबर बिबट्या सारख्या हिंस्त्र प्राण्यांनी आघात चालविला आहे. येथिल जनावरांना वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
कूसूंबीमूरा ता जावली येथिल पदमावतीचा पायठा येथे आज पांडूरंग कोकरे यांची गाय बिबट्याने खाल्ली आहे. त्यामुळे साधारण 15 ते 20 हजार रूपयांचे नुकसान पांडूरंग कोकरे यांचे झाले आहे.
शेतकर्यांच्या जनावरांचे दिवसेंदिवस वन्य प्राण्यांकडून प्राण जात असल्याने वन विभागा कडून अशा प्राण्यांचे उपाय योजना करणे गरजेचे आहे. तसेच ज्या शेतकर्याचे जनावर दगावले आहे त्यांना आर्थिक मदत देणे गरजेचे असुन त्यामुळे नामशेष होत असलेला दुग्ध व्यवसाय स्थिरावण्यास मदत होईल.