भोर ! संतोष म्हस्के ! नीरा-देवघरचा उजवा कालवा होणार चकाचक : अस्तरीकरणासाठी २१४ कोटींचा निधी मंजूर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : प्रतिनिधी
 नीरा- देवघर उजव्या कालव्याची मागील दोन वर्षांपासून भोर तालुक्यातील अस्तरीकरणाचे ५५ किलोमीटरचे काम निधी अभावी रखडले होते. खासदार सुप्रिया सुळे तसेच जि.प.माजी उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांच्या पाठपुराव्याने कालव्याच्या ५५ किलोमीटरच्या अस्तरीकरणासाठी १८६ कोटी तर डावा कालवा बंद सुधारित अंदाजपत्रकास २८.७६ कोटी निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिली.
    निरा देवघर उजव्या कालव्याचे १० किलोमीटरचे अंतरावरील अस्तरीकरणाचे काम मागील दोन वर्षात पूर्ण करण्यात आले होते.पुढील सांगवी ते वडगाव पर्यंतचे उर्वरित कामासाठी निधी मंजूर झाल्याने अस्तरीकरण लवकरच सुरू होणार आहे.कालव्याच्या अस्तरीकरणामुळे पाणी गळती थांबणार असून हजारो लिटर वाया जाणारे पाणी याची बचत होणार आहे. तर पाणी गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांची वर्षभर नापीक राहणारी शेतजमीन पीक घेण्यास उपयुक्त ठरणार आहे.अस्तरीकरणाचे काम लवकरच सुरू होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
To Top