बारामती ! विजय लकडे ! ... खंडोबाचीवाडीचे तलाठी भाऊसाहेबच हातात कोयता घेतात तेंव्हा...! महसूल विभागाच्या मध्यस्थीने सात वर्षांचा रस्त्याचा वाद मिटला...

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
नीरा : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील खंडोबाचीवाडी येथील शेतात जाणारा रस्ता गेल्या सात वर्षापासून वाहतुकीची बंद होता.  बारामती महसूल विभागाने यावर सामंजस्याने तोडगा काढत दोन शेतकऱ्यांच्यातला वाद मिटवत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
              खंडोबाचीवाडी येथे गट नं ३५१ मधील बबन गेनाबा लकडे व पुष्पा सोपान लकडे यांच्यात रस्त्यावरून सात वर्षपासून वाद होता.  होता. बारामतीचे तहसीलदार विजय पाटील, बारामती मंडल अधिकारी रवींद्र पारधी तलाठी दादा आगम वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे दीपक वारुळे, अमोल भोसले यांच्या मध्यस्थीने मिटला . दोन्ही फिर्यादी ना सामोरा समोर घेऊन या वादावर सामाज्यस्याने कायमचा पडदा टाकला यावेळी खंडोबाचीवाडी व गडदर वाडी येथील बाप्पू गडदरे अतुल लकडे सोमनाथ कटरे रावबा धायगुडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी बारामती महसूल विभागाचे आभार मानले. रस्त्याचा वाद कायमस्वरुपी मिटल्यामुळे ग्रामस्थांनी समधान व्यक्त केले.
---------------
तलाठी भाऊसाहेब हातात कोयता घेतात तेंव्हा....
गेल्या सात वर्षापासू न प्रलंबित असलेला रस्ता शेतकऱ्यांच्या सामंजस् भूमिकेमुळे मोकळा करण्याचे ठरल्यानंतर तलाठी भाऊसाहेब दादा आगम यांनी स्वतः हातात कोयता घेत उभा ऊस तोडण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.
To Top