सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
खेड शिवापूर टोल नाका नियोजित जागेत असता तर स्थानिकांचा टोल देण्याचा विषयच आला नसता. पण पैशाच्या हव्यासापोटी अनेकजण लाचार झाल्याने त्याचा त्रास स्थानिकांना सोसावा लागत आहे. सर्व पक्षीय आमदार, खासदार असताना सत्ता सर्वांनी उपभोगली, मग सत्ता असताना टोलनाका हटवण्यासाठी आजी-माजी सत्ताधाऱ्यांनी मनापासून ताकद लावली नाही. यात काही सामाजिक संस्था आणि स्वयं घोषित सामाजिक कार्यकर्त्यांनी हात धुतले, २० वर्षापासून ही टोलधाड सुरू आहे. असा स्थानिक नागरीकानी आरोप केला आहे.
महामार्गाच्या कामाची परिस्थिती पहाता नियोजित कामे झाली का, साईडपट्या आणि सोयीसुविधाचा अभाव आहे. दिवसाढवळ्या टोलधाड चालू असून सर्वसामान्यांच्या
खिशावर दरोडा टाकण्याचे काम सुरू आहे. यावर कोणताही स्थानिक नेता ठामपणे बोलत नाही. सर्वसामान्यावर होणाऱ्या टोल वसुलीचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. वादग्रस्त खेड शिवापुर टोलनाका उभारणीपासून आतापर्यंत बेकायदेशीर टोलवसुली चक्र चालू आहे. महामार्गाचे कामकाज अपूर्ण आहे. स्थानिकांनी कोणीही टोल देऊ नका, याबाबत महामार्ग प्राधिकरण आणि टोलनाका प्रशासनास न्यायालयात खेचणार आहे.