बारामती ! गाव करी तो राव काय करी.....! वाघळवाडी गावाने तरुणांना सत्तेत बसवलं...ग्रामसभा घेतली......त्यात ग्रामस्थांनी पाठिंबा देत दारूबंदीचा ठरावचं केला

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाघळवाडी ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच अँड. हेमंत गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली  पार पडली. वाघळवाडी गावातील महिलांनी आणि ग्रामस्थांनी ग्रामसभेत मांडलेल्या विषयास सर्वानी एकमताने मंजुरी देत अवैद्यरित्या विक्री केली जाणाऱ्या दारू बंदीचा ठराव घेण्यात आला. गावात शुद्ध पाणी मिळण्यासाठी जल जिवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजने संदर्भात सर्व समावेशक चर्चा पार पडली. विरोधी पक्षनेते अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाने राबवण्यात येणाऱ्या या महत्वपूर्ण अश्या योजनेतून संपूर्ण गावाला शुद्ध पाणी मिळणार असून २२ कोटी इतक्या निधीतून योजना राबविण्यात येणार आहे. 
          तसेच विविध ग्रामविकास समित्यांचे पुनर्गठन करण्यात आले, 100% घरपट्टी व पाणी पट्टी वसूल करणे या साठी नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, अंत्यविधीच्या जागेच्या ठिकाणी उपाययोजना व सुधारणा करणे अश्या विषयांवर चर्चा करत ठराव घेण्यात आले.
    गावातील मुलांना, ग्रामस्थांना निवांतपणे वेळ व्यतिथ करता यावा या करिता  वनउद्यान उभारण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी या ठिकाणी पर्यावरण समतोल राखुन वनउद्यान साकारण्यात यावे असे सर्वानमते ठरविण्यात आले.
      गावातील शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी असलेले अनेक वर्षापासून बंद झालेले रस्ते तसेच ओढे खुले करण्याबाबत संबंधित शेतकऱ्यांशी बोलून तसेच यावर मार्ग खुले करण्यासाठी प्रशासनाकडे मदतीची मागणी करण्याचे ठरले. तसेच निरा डावा कालव्यावर घाडगे वस्ती नजीक रहदारी साठी पूल करण्यात यावा असे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा निर्णय घेण्यात आले.
         गावांतील आजी-माजी सैनिक यांना करमाफी देण्याबाबत अनेक दिवसांपासून मागणी होत होती.परंतु त्या संदर्भात निर्णय घेण्यात आला नव्हता. यावर या ग्रामसभेत सैनिकांच्या मिळकतीच्या करमाफी करण्याचा ठराव करून ऐतिहसिक निर्णय घेण्यात आला.  गावच्या दृष्टीने विकासासाठी पूरक असलेले विविध विषयांवर उपस्थित ग्रामस्थांनी खुलेपणाने चर्चेत सहभागी घेत सर्व विषयांना मंजुरी देत  ग्रामसभा पार पडली. या वेळी  ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच ,ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.
 
To Top