सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी तालब्रह्म परिवार, सोमेश्वरनगर यांच्याकडून पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय अंतर्गत घेण्यात आलेल्या तबलावादन परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या मुलांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र,व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ.प. राजेंद्र दादा सोळसकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले. तसेच बाळासाहेब महाराज बारवकर, आकाश महाराज जगताप, दत्तात्रय महाराज भोसले(गुरुजी) , दत्तात्रय महाराज गावडे, मोहन काका भांडवलकर , हेमंत गायकवाड ( सरपंच वाघळवाडी) यांनी मार्गदर्शन केले. तालब्रह्म परिवार चे अध्यक्ष तबलावादक स्वप्निल बाबुराव शिंदे यांनी सुत्रसंचालन केले.मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सोमेश्वर पंचक्रोशीतील संगीत क्षेत्रातील हा प्रथमच कार्यक्रम होता. गेली चार वर्ष तालब्रह्म परिवाराच्या माध्यमातून तबला व मृदंग शिक्षण दिले जात आहे याचा फायदा बारामती तालुक्यातील संगीत प्रेमींनी घ्यावा, असे आवाहन भोसले गुरुजी यांच्यावतीने करण्यात आले.