सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील भाटघर धरण परिसरातील दुर्गम डोंगरी मौजे डेहेन ता.भोर येथील गावठाण क्षेत्रावर गावातीलच काही लोकांनी केलेल्या अतिक्रमणा विरोधात आमरण उपोषण तसेच धरणे आंदोलन बहुतांशी स्थानिक ग्रामस्थ, तरुण,महिला मंगळवार दि.२८ उपविभागीय कार्यालय भोर या ठिकाणी करणार असल्याचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील यांना देण्यात आले आहे.
ब डेहेण ता.भोर येथील एक इसम व त्यांच्या घरातील इतर व्यक्ती व भावकीतील व्यक्ती गावठाण बळकवण्याच्या तयारीत असून येथील गरीब व अडाणी शेतकऱ्यांवर त्यांच्या असणाऱ्या घरावर ताबा मारण्याच्या धमक्या देत आहेत. तर घर खाली करण्यासाठी लोकांच्या पाठीमागे तगादा लावला आहे. गावठाणातील असणाऱ्या मिळकती व त्यांच्या आसपास असणारे वडिलोपार्जित्व पिढ्यान पीठया असलेले लागवडी खालील बांबू ,मेस, आंबा, फनस तसेच असणारी झाडे तोडून टाकून झाडांपासून मिळणारे उत्पन्न स्वतःच घेत आहेत.गावातील इतर लोकांवर दबाव निर्माण करून दहशत निर्माण करीत आहेत अशा प्रकारे संपूर्ण गावाला विरोध करून गावठाण बळकवण्याच्या तयारीत आहेत.गावठाणातील असलेले बांबू हे माझ्या मालकीच्या हद्दीमध्ये येत असून गावठाणातील जमिनीचा मालक आम्हीच आहे. गावाला कोणत्याही प्रकारचे गावठाण नाही असे खोटे सांगून गावातील अडाणी लोकांची फसवणूक व दिशाभूल करीत असून अतिक्रमण केलेले असल्याने गावातीलच बहुतांशी लोकांनी होणाऱ्या अतिक्रमणा विरोधात अमरण उपोषण तसेच धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून हे धरणे आंदोलन व उपोषण मंगळवार दि.२८ होणार आहे. यावेळी महादेव बाबुराव दूरकर, पांडुरंग दगडू दूरकर ,लक्ष्मण सदाशिव दूरकर, संतोष विठ्ठल दूरकर, दत्ता गेनबा दूरकर ,अमित किसन दूरकर ,नितीन रामचंद्र दूरकर आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.