सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
इंदापूर : प्रतिनिधी
लाखेवाडी (ता. इंदापूर) येथील एका हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा घालत कारवाई आहेत. केली. त्यात देशी विदेशी मद्यासह बिअरच्या बाटल्या ताब्यात घेत संतोष प्रभाकर खाडे आणि प्रभाकर तुकाराम खाडे (दोघेही रा. लाखेवाडी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लाखेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सूत्रे हाती घेताच सरपंच चित्रलेखा ढोले यांनी लाखेवाडी पंचक्रोशीत सुरु असणारे दारूबंदी, मटका, जुगारसारखे अवैद्य धंदे मोडीत लढण्यासाठी १३ जानेवारी २०२३ रोजी महिलांची विशेष ग्रामसभा घेत ठराव मंजूर केला होता. त्यानंतर पोलिस आक्रमक होत कारवाई करीत आहेत. यापूर्वी दोन कारवाया झाल्या आहेत.
त्यानंतर २३ फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठच्या राज्य उत्पादन दरम्यान शुल्क दौंड विभागाचे निरिक्षक प्र. भा. पोळ यांच्या सूचनेनुसार कर्मचारी ए. के. पाटील यांनी लाखेवाडी हद्दीतील बावडा वालचंदनगर रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेल जय संतोषी माता या ठिकाणी छापा टाकून ४ हजार ५८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात देशी विदेशी मद्य बिअर अशा विविध ४० सीलबंद बाटल्यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.