पुरंदर ! सोमेश्वर करखान्याच्या एका संचालकाच्या खडी क्रशरच्या विरोधात दुसऱ्या संचालकासह ३०० ग्रामस्थ बसले उपोषणाला : गुळूंचे-कर्नलवाडी नियोजित खडीमशीन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सासवड : प्रतिनिधी
पुरंदर तालुक्यातील गुळूंचे कर्नलवाडी परिसरातील सहा गावंचा विरोध असणाऱ्या खडिमशीन विरोधात आभरण उपोषणाला सोमवार दि. २७ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून सुरवात झाली आहा. परिसरातील सुमाराला ३०० ग्रामस्थ या आंदोलनासाठी सासवडच्या प्रांत कार्यालयासमोर बसुन आहेत. विशेष म्हणजे सोमेश्वर कारखान्याचे संचालक जितेंद्र निगडे हे देखील उपोषणाला बसले आहेत. 
          गुळूंचे कर्नलवाडीसह पिंपरे, थोपटेवाडी, पिसुर्टी, वाल्हे, सुकलवाडी  ग्रामस्थांचा विरोध असतानाही नियोजित खडिमशीन मालाकाचे काम सुरुच आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वरचे संचालक शैलेंद्र रासकर यांनी  नियोजित खडिमशीनच्या ठिकाणी जिलेटीनचा स्फोट उडवल्याने बोलाईमातेच्या प्रचिन गुफेत हदरे बसल्याने ग्रामस्थांनी जेजुरी पोलीसांत तक्रार अर्ज दाखल केला. यानंतरही कारवाईन झाल्याने ग्रामस्थांनी उपोषणाचा इशारा. खा.सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा घडवली. 
               जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ग्रामस्थ समाधानी झाले नाहीत. सोमवारी सकाळी बोलाईमातेला अभिषक घालून गुळूंचे कर्नलवाडी परिसरातून महिला व ग्रास्थांनी सासवड येथील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. 
        उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. यावेळी शिवसेनेचे अतुल म्हस्के, माणिक निंबाळकर, हरीभाऊ लोळे, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रदिप पोमण, विठ्ठल मोकाशी, संभाजी कळाणे, भाग्यवान म्हस्के, राष्ट्रवादी कॉंग्रसचे अशोक टेकवडे, प्रा.दिगंबर दुर्गाडे, सुदाम इंगळे, पुष्कराज जाधव, विराज काकडे,बंडूकाका जगताप, शेतकरी संघटनेचे दिलीप गिरमे, भा.ज.पा.चे गंगाराम जगदाळे, सचिन लंबाते, साकेत जगताप, अमोल जगताप, नवनाथ बरकडे,    यांसह सर्वपक्षांचे पदाधिकाऱ्यांनी या खडिमशीन विरोधात समर्थन देत आंदोलनाला पाठिंबा दिला.
To Top