सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या बाष्पके संचालनाच्या वतीने घेण्यात आलेल्या बॉयलर ऑपरेशन इंजिनियर या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत सोमेश्वर येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे इंजिनिअर रणजित कदम सचिन राणे निखिल जगताप उत्तीर्ण झाले आहेत .
डिप्लोमा व डिग्री झालेल्या अभियंत्यांसाठी दरवर्षी स्पर्धा परीक्षा घेतली जाते. डिप्लोमा धारकांसाठी पाच वर्षाचा तर डिग्रीधारकांसाठी दोन वर्षाचा ऑपरेशन व मेंटनस विभागाचा अनुभव आवश्यक असतो. या परीक्षेसाठी वरील तिघे पात्र ठरले.