सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

पुरंदर ! चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करणाऱ्या पतीच्या सासवड पोलीसांनी अवघ्या अठरा तासात अवळल्या मुसक्या


 सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
 दि. २५/०२/२०२३ रोजी सायंकाळी ६:०० वा. दरम्यान सासवड पोलीसांना खबर मिळाली की, सासवड जवळ वाघापुर रोडवरील आंबोडी फॉरेस्ट मध्ये एक महिला जखमी अवस्थेत पडलेली असुन तिचे कपडे रक्ताने भरलेले आहेत. तिचे जवळ २ वर्षाचे लहान मुल रडत बसले आहे. सासवड पोलीसांनी तात्काळ तेथे जावुन त्या जखमी महिलेस व लहान मुलास अॅम्बुलन्समधुन सासवड रूग्नालय येथे आणले. तेथे डॉक्टरांनी महिलेचा कशानेतरी गळा कापल्याने मयत झाल्याचे सांगितले. सुरवातीला तिची ओळख पटवणे अवघड होते परंतु तिचे जवळील पिशवीत एक चिठठी मिळुन आली त्यावर नाव व मोबाईल नंबर होता. त्यावर फोन करून माहिती घेतली असता तिचे नाव अनिता महेश बनकर, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे असल्याचे समजले. पोलीसांनी नातेवाईकांचा शोध घेवुन मयत महिलेची ओळख पटवल्यानंतर समजले की, पती महेश व मयत पत्नी अनिता यांचेत कौटुंबिक वाद - आहेत व दोघे पती पत्नी एकमेकांपासुन वेगळे पती महेश हा त्यांचे आई, भाऊ व मुलगी सह आंजलीनगर, कात्रज, पुणे व पत्नी अनिता हि आंबेडकरनगर, मार्केट यार्ड, पुणे येथे राहात असल्याचे चौकशीत समजले. दोघा पती पत्नीचे वाद असल्यामुळे व पती महेश बनकर याचा फोन सायंकाळी ६:०० वा. पासुन बंद येत असल्याने सासवड पोलीसांना संशय वाढला की, अनिता हिचा खुन हा तिचा पती महेश बनकर यानेच केला असावा. दरम्यान मयत अनिता हिचे नातेवाईकांनी सासवड पोलीस स्टेशन येथे पती महेश बनकर यानेच अनिता हिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला जिवे ठार मारले आहे व लग्न झालेपासुन अनिता हिला पती महेश बनकर व सासु कमलाबाई बनकर हे तिचे चारीत्र्यावर संशय घेवुन शारीरीक, मानसिक त्रास देत होते. सदर बाबत ससवड पोलीस स्टेशन येथे गु. रजी.नं. ११९ / २०२३ भा.दं.वि.का.क. ३०२, ३०४(ब), ४९८ (अ), ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला.

पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांनी तात्काळ सहा. पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, गणेश पोटे, निलेश जाधव, सुहास लाटणे यांना पती महेश बनकर यांचा शोध घेवुन ताब्यात घेण्यास सांगितले त्याप्रमाणे वरील पथकाने महेश बनकर राहात असले ठिकाणी आंजलीनगर, कात्रज, पुणे येथे जावुन शोध घेतला तो मिळुन आला नाही. त्यानंतर त्याचे मुळ गावी माळशिरस, ता. पुरंदर येथे जावुन शोध घेतला तो मिळुन आला नाही. मयत अनिता हिचे पोस्ट मॉर्टम झाले पण जो पर्यंत "पोलीस आरोपीस अटक करत नाही तो पर्यंत आम्ही अनिताचा मृतदेह ताब्यात घेणार नाही" असे तिचे नातेवाईकांनी आग्रह धरला. 

तपासा दरम्यान आज सकाळी ११:०० वा. पोलीस पथकास बातमी मिळाली की, महेश बनकर • हा नाझरे येथिल हॉटेल मयुरमध्ये बसला आहे. वरील पोलीस पथक तात्काळ तेथे पोहाचले परंतु पोलीस पाहोचण्यापुर्वी १० मिनीट महेश बनकर हा नायगांवच्या बाजुने पांढरे रंगाच्या स्कुटी मोटार सायकलवर गेल्याचे समजले. पोलीस नायगावच्या बाजुने गेले असता रोडवर हॉटेल आकाश समाधानचे समोर महेश बनकर यांची पांढरे रंगाच्या स्कुटी मोटार सायकल दिसली. पोलीस गाडीतुन खाली उतरत असल्याचे पाहताच महेश बनकर हॉटेलच्या पाठिमागे शेतात पळत सुटला. परंतु पोलीसांनी त्यास काही अंतरावर पाठलाग करून ताब्यात घेतले व त्याने सांगितले की, "आम्हा पती पत्नीचे वाद होत असत, आम्ही वेगवेगळे राहात होतो, परंतु तिचे वागणे बरोबर नव्हते, नको त्या लोकांशी ती बोलत होती, माझे ऐकत नव्हती. म्हणुन तोच राग मनात धरून तिला गोड बोलुन पुणे येथून मोटार साकलवर बसवुन सासवड येथे घेवुन आलो व फॉरेस्टमध्ये नेवुन पत्नी अनिता हिचा चाकुने गळा कापुन खुन केला" असल्याची कबुली दिली. सासवड पोलीसांनी पती व सासु यांना गुन्हयाचेकामी अटक केली आहे.पती महेश पंडीत बनकर, वय २४ वर्षे, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे. सध्या अंजलीनगर, कात्रज, पुणे. व 
सासु – कमलाबाई पंडीत बनकर, वय ४५ वर्षे, रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे. सध्या अंजलीनगर, कात्रज, पुणे.यांना अटक केली आहे. 
         वरील कामगिरी मा. पोलीस अधीक्षक सो, अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सो, बारामती आनंद भाईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी सो, भोर विभाग धनंजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सासवड पोलीस स्टेशन आण्णासाहेब घोलप, सहा. पोलीस निरीक्षक विनोद महांगडे, पोलीस नाईक गणेश पोटे, निलेश जाधव, सुहास लाटणे, प्रतिक धिवार, सुनिल कोळी (सायबर पोलीस स्टेशन), पोलीस मित्र सचिन चंदनशिव, शुभम घोडके यांचे पथकाने केलेली आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : पुरंदर ! चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करणाऱ्या पतीच्या सासवड पोलीसांनी अवघ्या अठरा तासात अवळल्या मुसक्या
पुरंदर ! चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन करणाऱ्या पतीच्या सासवड पोलीसांनी अवघ्या अठरा तासात अवळल्या मुसक्या
https://lh3.googleusercontent.com/-ZoGuLpsOvtw/Y_yTvNECSuI/AAAAAAAAVd8/Su7VWnIAx7Yj-ZSNhFkBu_4PHSL1k-G3wCNcBGAsYHQ/s1600/1677497267698203-0.png
https://lh3.googleusercontent.com/-ZoGuLpsOvtw/Y_yTvNECSuI/AAAAAAAAVd8/Su7VWnIAx7Yj-ZSNhFkBu_4PHSL1k-G3wCNcBGAsYHQ/s72-c/1677497267698203-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2023/02/blog-post_336.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2023/02/blog-post_336.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy