सोमेश्वर रिपोर्टर टीम------
लोणंद : प्रशांत ढावरे
साताऱ्याहून नगरकडे निघालेल्या आयशर टेम्पोच्या धडकेत निरेहून लोणंद ला निघालेल्या दत्ता जाधव व सतीश लकडे रा. निंबुत- निंबुत छप्री ता. बारामती हे युवक आपल्या एमएच-४२- ६६०९ या दुचाकीवरून जात असता मुख्य चौकात पेट्रोल पंप समोर आयशरने व दुचाकीची जोरदार धडक झाली.
या धडकेत दत्ता जाधव या युवकाच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर सतीश लकडे हे किरकोळ जखमी झाले आहेत. आयशरचा चालक फरार झाला आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.