मेढा ! जवळवाडी गावच्या विकासासाठी कटीबद्ध : आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले : विविध विकास कामांचे भूमिपुजन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
मेढा : ओंकार साखरे
मेढा - जवळवाडी गावचा जिल्ह्यात गोविंदा पथकाच्या माध्यमातून दबदबा असुन तरुणांनी एकीच्या चळवळीचा नावलौकिक वाढवला आहे. विकास कामांबाबत जवळवाडीला कायम झुकते माप दिले आहे. पुढची पन्नास वर्षाची लोकसंख्या लक्षात धरून ही जल जीवन मिशन योजना तयार करण्यात आली असून निधीही खूप आहे. सुशोभीकरणासाठी रस्ता रुंदीकरण करताना ग्रामस्थांचे सहकार्य गरजेचे आहे. सर्वांनी हेवेदावे विसरून एकी दाखवल्यास गावचा विकास चांगल्या पद्धतीने होईल. पाणीपुरवठा योजना ही कायमची झाली तरच तिचा फायदा गावाला होईल. यापुढे जवळवाडीने आम्हाला साथ द्यावी आम्ही गावच्या विकासासाठी कटीबद्ध असून निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
           जवळवाडी येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेच्या आणि भूकंप पुनर्वसन योजनेतून मंजूर आरसीसी बंदिस्त गटार योजनेच्या भूमिपूजन प्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. यावेळी माजी जि प उपाध्यक्ष वसंतराव मानकुबरे, माजी उपसभापती कांतीबाई देशमुख, सरपंच सौ. सुरेखा मर्ढेकर , उपसरपंच शंकर जवळ , माजी नगराध्यक्ष पांडुरंग जवळ , माजी उपनगराध्यक्ष दत्तात्रेय पवार, माजी नगरसेवक शशिकांत गुरव, विकास देशपांडे, उद्योजक विजय शेलार , मच्छिंद्र क्षीरसागर, संतोष वारंगडे, एकनाथ पवार ,अविनाश कारंजकर, प्रशांत करंजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
         आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की जवळवाडी गावची स्वतंत्र पाण्याची योजना एक कोटी 81 लाख 11 हजार 704 रुपये खर्च होऊन कार्यरत केली जाणार आहे. त्यामुळे गावचा भविष्यातील पन्नास वर्षाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. जवळवाडी गाव जावळी तालुक्यात एकीचे गाव असून गोविंदा पथकामध्ये जिल्ह्यात अग्रेसर आहे. त्यामुळे सर्वांनी एकीने राहून गावचा सर्वांगीण विकास करावा. मुस्लिम समाजाचे असणारे सर्व प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी यावेळी त्यांनी सांगितले .
         यावेळी वसंतराव मानकुबरे म्हणाले जवळवाडी गावचे विकासकाम आत्ता शिल्लक राहणार नाही . आगामी जि प व पंचायत समितीच्या निवडणुकीत जवळवाडीला प्राधान्य दिले जाईल. पूर्वीच्या सर्व आमदारांपेक्षा आ. शिवेंद्रसिंहराजेंनी तालुक्यात रस्त्याचे जाळे विणून विकास कामांचा डोंगर उभा केला असून बोंडारवाडी धरण सुद्धा शिवेंद्रसिंहराजेच करणार आहेत असेही सांगीतले. प्रास्ताविकामध्ये सतीश मर्ढेकर यांनी जवळवाडी गावात पुन्हा येताना आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी मंत्री म्हणूनच यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 
           यावेळी योजना तयार करणारे शाखा अभियंता प्रवीण कांबळे, खादी ग्रामोद्योगचे संचालक रघुनाथ जवळ, ठेकेदार सुभाष ओंबळे, सूर्यकांत जवळ, चंद्रकांत जवळ, राजाराम जवळ, अजित मर्ढेकर यांचा सत्कार आ. शिवेंद्रसिंहराजे च्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच सदाशिव जवळ, साहेबराव धनवडे, ज्ञानदेव जवळ, शंकर जवळ, सागर जवळ, सुरेशबुवा जवळ, राजेंद्र निकम, विजय धनवडे, सूर्यकांत जवळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार गीता लोखंडे यांनी मानले. 
To Top