सोमेश्वर रिपोर्टर टीम----------
मेढा : ओंकार साखरे
श्रीमंत रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवा निमित्त छत्रपती श्री संभाजी महाराज ६ वे साहीत्य संमेलन फलटण येथे मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून संपन्न झाले. या कार्यक्रमात राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व व्यसनमुक्त युवक संघाचे मार्गदर्शक श्री विलासबाबा जवळ यांच्या मातोश्री, श्रीमती पार्वती शंकर जवळ (जवळवाडी) यांना ॲग्रोन्युज परिवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्तिक जगन्नाथ शिंदे यांचे शुभहस्ते देण्यात आला.
पार्वती जवळ यांनी अत्यंत खडतर परस्थितीत संघर्षमय जीवन जगत आपल्या मुलांना घडविण्याचे काम केले आहे.विलासबाबा जवळ यांच्या कार्यातून त्यांनी दिलेले संस्कार दिसून येतात.ज्या आईला व्यसनाधिनतेचे चटके सोसावे लागले अशा मातेच्या हयातीतच संपूर्ण तालुका दारू दुकानमुक्त करण्याचे काम विलासबाबांनी महिलांच्या माध्यमातून करून दाखविले. अतिशय कष्टमय जीवन जगत असताना पार्वती आईंनी मोलमजूरी करीत अगदी बिगारी काम सुध्दा केले.अशा या मातेला ॲग्रोन्युज परिवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने सोमवार दि.२७ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेचे मा.सभापती मा.श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात पार्वती जवळ यांना राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्काराने गौरविताना त्यांना सन्मानचिन्ह,मानपत्र, शाल-श्रीफळ व मानाचा फेटा देवून गौरविण्यात आले.
या प्रसंगी बोलताना जगन्नाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून राष्ट्रमाता जिजाऊंनी दिलेल्या संस्कारातूनच छ.श्री शिवाजीमहाराज,छ.संभाजी महाराज घडले आणि आयुष्यभर स्वराज्यासाठी लढले.अशा राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावे दिल्या जाणार्या पुरस्कारामुळे जवळ कुटुंबाला भावी आयुष्य जगताना नक्कीच बळं मिळेल.या कार्यक्रमाला जेष्ठ साहित्यिका संगिता जामगे, दुष्यंत जगदाळे, ॲग्रोन्युज परिवारचे अध्यक्ष प्रकाश सस्ते,कार्याध्यक्ष प्रा.नितीन नाळे,विलासबाबा जवळ, अरूण जवळ,द्रोपदा जवळ इ.मान्यवर उपस्थित होते.