सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील एका युवकाला इन्स्टाग्रामवर कोयत्यासह फोटो ठेवणे महागात पडले. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनाच मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी बारामती शहर पोलिसांना याबाबत तातडीने कारवाईचे आदेश दिले.
'अर्पित मोहिते किंग ऑफ बारामती' या इन्स्टाग्राम पेजवर कोयत्यासह एका युवकाचा फोटो
दिसल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षकांना मिळाली होती. त्यांनी संबंधितावर कारवाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील आदेश दिल्यानंतर अतिरिक्त फौजदार युवराज घोडके, पोलिस पोलिस अधीक्षक आनंद भोईटे व अंमलदार दशरथ कोळेकर, कल्याण खांडेकर, दशरथ इंगवले, आकाश यांनी त्या युवकाचा शोध घेतला.
अर्पित सचिन मोहिते (वय २२, रा. बारामती) याच्याकडे चौकशी केली असता हौस म्हणून त्याने चार वर्षांपूर्वी काढलेला कोयत्यासोबतचा फोटो क्रेझ म्हणून स्वतःच्या इन्स्टाग्रामवर ठेवला होता. पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली, तसेच घरातील कोयताही जप्त केला.