सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
सोनार समाजाचे आराध्यदैवत संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त बारामती येथे प्रत्येक वर्षी नवीन लग्न झालेल्या जोडीला किंवा महाप्रसाद दिलेल्या जोडीला महापुजेचा मान दिला जातो.
बारामती तालुका सोनार समाज सेवा संघाच्या वतीने मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो या उत्सवामध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळे समाजातील अनेक दानशूर व्यक्ती स्वयंस्फूर्तीने खर्च करण्यास पुढे येतात, परंतु बारामती सराफ असोसिएशन चे मा.अध्यक्ष नानासाहेब गटगिळे हे गेली 12 वर्षांपासून महापूजेला बसणाऱ्या जोडीला स्वखर्चाने संपूर्ण पोशाख आणि मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करतात, वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या नानांचा पुण्यतिथी उत्सवामध्ये तरुणांप्रमाणे उत्साह असतो, आपल्या प्रसंगानुरूप कविता मधून ते समाजातील चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचे कौतुक करायला कधी विसरत नाहीत.. या वयातील त्यांचा उत्साह आणि दानशूरपणाची दखल घेऊन सोनार समाज सेवा संघांचे अध्यक्ष रघुनाथ बागडे यांनी नानाच्या वाढदिवसादिवशी विशेष गौरव करणार असल्याचे सांगितले.