भोर ! संतोष म्हस्के ! प्रतिस्पर्धी पैलवानाला धोबीपछाड देत खानापूर कुस्ती आखाड्यात पै सुमित मरगजे गदेचा मानकरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील खानापूर ता. भोर येथील ग्रामदैवत भैरवनाथ देवाच्या याञेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात कै.पै.तुकाराम थोपटे यांच्या स्मरणार्थ ठेवलेल्या भैरवनाथ चांदीच्या गदेचा अटीतटीच्या लढतीत पै.सुमित मरगजे यांनी मान पटकावला. 
     ग्रामदैवत भैरवनाथ देवाची याञा उत्साहात पार पडली.उत्सवानिमित्त देवाला महाअभिषेक, महापूजा व महाआरती नंतर काठी पालखीची ग्रामप्रदक्षिणा तर देवाचे बगाडाचा कार्यक्रमही पार पडला.कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात १०० रुपयांपासून ते १ लाख रुपयांपर्यंत ३०० हून अधिक पैलवानांनी कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटेल अशा नेत्रदीपक कुस्त्या केल्या.आखाड्यात पंच म्हणून पै.जयवंत कोंढाळकर,पै. शिवाजी थोपटे ,पै.हनुमंत थोपटे, पै. शामराव नांगरे पै. अर्जुन मालुसरे, पै.सुनील थोपटे, पै.सोपान नांगरे यांनी काम पाहिले.यावेळी राजगड संचालक उत्तम थोपटे  ुु
 ,तंटामुक्ती अध्यक्ष राजू धोत्रे, माजी सरपंच चंद्रकांत नांगरे,युवा उद्योजक रवी थोपटे,प्रा.भानुदास थोपटे, संपत तनपुरे,दीपक गोळे,जयवंत थोपटे,दत्ता तनपुरे,सुरेश धोत्रे,कर आयुक्त तानाजी थोपटे,रामचंद्र थोपटे,शिवाजी रामभाऊ थोपटे,पै.किसन थोपटे,संतोष रवळेकर,दत्तात्रय थोपटे, साहेबराव थोपटे,पोपट मालुसरे,शरद पवार, सुरेश थोपटे,बळीराम थोपटे,दत्तात्रय तनपुरे आदींसह  हजारो कुस्ती शौकीन उपस्थित होते.

फोटो - गदेचा मानकरी ठरलेल्या पैलवानचा फोटो पाठवीत आहे.
                                      संतोष म्हस्के
To Top