बारामती ! दूध नाही लिटरभर ...अनं..गप्पा झोडतोय हातभर..: राहतो पुण्यात आणि गप्पा मारतो कुरणेवाडीच्या

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बारामतीतील तरुण दूध उत्पादकांनो सावधान.... कुरणेवाडी गावातील व सध्या पुण्यामध्ये वास्तव्यास असलेला एक भामटा तरुण दूध उत्पादकांची डोकी भडकवण्याचे काम करत आहे. 
             कुरणेवाडीतील एका मोठ्या पदाधिकाऱ्याशी असलेली त्याची दुश्मनी तो तरुण दूध उत्पादकांवर घ्यायला भाग पाडत आहे. गावात संबंधित पदाधिकाऱ्या विरोधात त्याची दुश्मनी आहे. अशातच संबंधित पदाधिकाऱ्याला बारामती दूध संघावर संधी मिळाल्याने या महाशयांची अवस्था पाण्यातून बाहेर पडलेल्या माशासारखी झाली आहे. काहीच हाती लागत नसल्याने या भामट्याने मागील वर्षापासून तरुण दूध उत्पादकांचा व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. या ग्रुपमध्ये तरुण दूध उत्पादकांना सामील करून दूध संघाबद्दल चुकीची माहिती सांगून तरुण दूध उत्पादकांची दिशाभूल करत स्वतःला दूध उत्पादकाबद्दल  खोटा कळवळा असल्याचे दाखवत आहे. 
               जेणेकरून दूध उत्पादक भडकतील आणि आपला हेतू सिद्ध होईल असा त्याचा प्लॅन असल्याचे अनेक जण खाजगीत बोलत आहेत. मात्र तरुण दूध उत्पादक हुशार असून या स्वयंघोषित दूध उत्पादक कैवारीच्या व्हाट्सअप ग्रुप वर कोणतीही पोस्ट करत नाही किंवा त्याला रिप्लाय देत नाहीत. पत्रकारांनी त्यांची बातमी लावली नाही म्हणून सुद्धा ते ग्रुप वर घसरतात. यातच कोणी एखाद्या ने या महाश्ययांच्या  विरोधात कमेंट केली की लगेच त्याला ग्रुप मधून रीम्हूह केले जाते व मग कमेंट करणाऱ्या विरोधात चुकीची माहिती गृपवर पोस्ट केली जाते. वास्तविक ग्रुप मध्ये ऍड असलेले बहुतेक तरुण दूध उत्पादक हे संबंधित दूध संघाला दूधच घालत नाहीत हे या महाशयांना माहितीच नाही. त्यामुळे दूध उत्पादक या गृपवर शांत असतात...मात्र लिटरभर डेअरीला दूध जात नसणाऱ्या या महाशयाची गाडी ग्रूपवर सुसाट असते. अशातच या  महाशयांनी जर संध्याकाळी  हातभट्टी मारली तर मग हे महाशय ग्रुपवर तालुक्याच्या जबाबदार पुढाऱ्यानसह बारामतीच्या आमदारांना सुद्धा उपदेशाचे डोस पाजतात. त्यामुळे लिटर भर सुद्धा दूध डेरीला न जाणाऱ्या दूध उत्पादकांचे नेतृत्व करू पाहणाऱ्या या स्वयंघोषित भामट्यापासून  सावधान
To Top