बारामती ! संत नरहरी महाराज यांची ७३७ वी पुण्यतिथी साजरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
बारामती : प्रतिनिधी
----------------------
बारामती तालुका सोनार समाज सेवा संघाच्या वतीने संत शिरोमणी नरहरी महाराजांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली,
 यावेळी बारामती सह, पुरंदर, इंदापूर, दौंड तालुक्यातील असंख्य समाजबांधव उपस्थित होते.
आज सकाळी पुनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ पेढीच्या संचालिका ऐश्वर्या आळंदीकर आणि कार्यकारी संचालक, शुभंम किरण आळंदीकर यांचे शुभहस्ते महापूजा करण्यात आली. त्यानंतर नरहरी महाराजांच्या प्रतिमेचे बारामती शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली, कसबा येथे नगरसेवक सुरज सातव यांनी मिरवणूकीचे स्वागत केले,दुपारी बारामती सराफ असोसिएशन चे अध्यक्ष,किरण आळंदीकर यांच्या वतीने समाजबांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, तर वसंत महाराज धुमाळ यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
याप्रसंगी किरण आळंदीकर, गणेश जोजारे, रघुनाथ बागडे, प्रकाश अदापुरे, अमृतराज मालेगांवकर, बारामती तालुका वारकरी संघांचे अध्यक्ष बाळासाहेब बारवकर, बाप्पू हिंगणे, चंद्रकांत माळवे, विद्या प्रतिष्ठान विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अतुल शहाणे, सुधाकर त्यारे, दिपक आळंदीकर,शिवाजी क्षीरसागर यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुधीर पोतदार, गोकुळ लोळगे, विठ्ठल कुलथे, योगेश बागडे, प्रतीक जोजारे, ओंकार उदावंत, गोपाळ क्षीरसागर, विजय जोजारे, अमोल बागडे, किशोर श्रीगंधे, गोवर्धन बागडे, अनिल शहाणे, प्रतीक बुराडे या उत्सव समिती सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक आणि त्यांच्या सहकाऱ्यानीं मिरवणुकी दरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.
To Top